कोयत्याने वार करून 
जिवे मारण्याचा प्रयत्न

कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी, ता. ३० : एका तरुणाला रस्त्यात अडवून मारहाण करून खून करण्याची धमकी देत अपहरण केले. त्यानंतर दुसऱ्या तरुणावर कोयत्याने वार करून, जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना चिखलीतील घरकूल येथे घडली. या घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत.
अमित अशोक चव्हाण (रा. वृंदावन हौसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओंकार ओव्हाळ व त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील साक्षीदार धीरज आढाव हा घरकुलाच्या एकता हौसिंग सोसायटीसमोरील रस्त्याने घरी जात होता. दरम्यान, एका आरोपीने धीरजचा रस्ता अडवून त्यास स्क्रू ड्रायव्हरने मारहाण केली. शिवीगाळ करीत खून करण्याच्या उद्देशाने दुचाकीवर जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण केले. घरकुलच्या बाहेर घेऊन जाऊ लागले असता, धीरजने फिर्यादीचे घर दाखवले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर जाऊन फिर्यादीच्या गळ्यावर कोयत्याने वार करून, जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत कोयत्याचा वार धीरजच्या डोक्याला लागल्याने त्यालाही दुखापत झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com