न्यूयॉर्कमधील पाणी परिषदेत
मोरया प्रतिष्ठानचा सहभाग

न्यूयॉर्कमधील पाणी परिषदेत मोरया प्रतिष्ठानचा सहभाग

पिंपरी, ता. ३१ : मोरया सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेला न्यूयॉर्कमध्ये आयोजित केलेल्या जागतिक पाणी परिषदेत विशेष निमंत्रित म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गणेश अंबिके यांनी संयुक्त राष्ट्र संघटना (युनायटेड नेशन्स) मध्ये ‘वॉटर हेल्थ ॲम्बेसिडर हा प्रकल्प सादर केला.
ही पाणी परिषद युनायटेड नेशन्सच्या मुख्य कार्यालयात पार पडली. परिषदेसाठी युनायटेड नेशनने स्वयंसेवी संस्थांना सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रकल्प सादर करण्यासाठी निमंत्रित केले होते. या मुदतीत चिंचवडमधील मोरया सामाजिक प्रतिष्ठानने ‘वॉटर हेल्थ ॲम्बेसिडर हा ट्रेनिंग देणारा प्रकल्प सादर केला होता. या परिषदेसाठी जागतिक स्तरावरील ११०० पेक्षा जास्त संस्थांनी वेगवेगळे प्रकल्प सादर केले होते. त्यातील ३४० प्रकल्पांना युनायटेड नेशन्सने मान्यता दिली. हा प्रकल्प युनायटेड नेशनच्या धोरणाप्रमाणे सर्व मान्यता मिळाल्यानंतर जगात सर्वत्र राबवण्यात येणार आहे.
मोरया सामाजिक प्रतिष्ठानला विशेष मान्यताप्राप्त संस्था म्हणून पुढील तीन वर्षांसाठी मान्यता मिळालेली आहे. प्रतिष्ठानने तयार केलेल्या प्रकल्पासाठी भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, युनायटेड नेशन्स आउटर स्पेस ऑस्ट्रियाचे संशोधक शिरीष रावण, संतोष चव्हाण, डॉ. सरोज अंबिके, आरती विभुते, नितीन साळी, महेश डोंगरे, राजेश डोंगरे, प्रीतम किर्वे यांचे सहकार्य मिळाल्याचे डॉ. अंबिके यांनी सांगितले.
फोटोः 33846

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com