Fri, June 2, 2023

एच३एन२चे
१९ रुग्ण बरे
एच३एन२चे १९ रुग्ण बरे
Published on : 30 March 2023, 2:43 am
पिंपरी, ता. ३० ः शहर परिसरात एन्फ्लुएंझा एच३एन२ विषाणू संसर्ग वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत सहा रुग्णांची भर पडली असून त्यात दोन रुग्ण शहराबाहेरील आहेत. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात शहरातील रुग्णसंख्या सहा होती. मात्र, मार्च महिन्यात अकरा रुग्णांची भर पडली. त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ७३ वर्षांचे पुरुष व ८७ वर्षांच्या महिलेचा समावेश होता. त्यांना अन्य फुफूस्स व ह्रदयाचेही विकार होते. आतापर्यंत १९ रुग्ण बरे झाले आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मास्क वापरावा, सर्दी, खोकला, ताप, घसादुखीची लक्षणे असल्यास डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत, असे आवाहन सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.
--