शहरातील २४ शाळांना ‘शंभर नंबरी’ यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरातील २४ शाळांना ‘शंभर नंबरी’ यश
शहरातील २४ शाळांना ‘शंभर नंबरी’ यश

शहरातील २४ शाळांना ‘शंभर नंबरी’ यश

sakal_logo
By

पिंपरी, ता.२५ : पिंपरी-चिंचवड शहरातील २४ कनिष्ठ महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांनी यंदा गुणांमध्ये चांगलीच आघाडी मारली. शहरातील शाळांनीदेखील स्वत:ची कामगिरी उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थ्यांप्रमाणेच शाळांनीदेखील घवघवीत यश मिळवले आहे. बहुतांश शाळांनी ‘शंभर नंबरी’ यश संपादित केले आहे. त्यामुळे निकालानंतर शहरातील शाळांमध्ये सेलिब्रेशनचे वातावरण होते. गेल्या काही वर्षांचा विचार करता, प्रस्थापित शाळांचेच वर्चस्व दिसून यायचे. पण यंदा नव्याने आलेल्या शाळांचीही कामगिरी उंचावल्याचे दिसून आले. शाळांनी निकाल चांगला लागावा, यासाठी वर्षभर विविध प्रयोग केल्याची माहिती आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपुढे गुण मिळावे, यासाठी शाळांनी विशेष मेहनत घेतली. याचाच परिपाक म्हणून यंदा पाच ते सहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शाळांनी देखील घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांकडे जास्तीत जास्त लक्ष देण्यासोबतच टेस्ट सीरिज घेण्याकडे शाळांचा कल दिसून आला. तर बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांचा पाया पक्का करण्याकडे लक्ष दिले. काही ठिकाणी तर दोन पेपरमधील सुटीच्या दिवसांमध्येदेखील विद्यार्थ्यांचा सराव घेण्यात आला होता. याशिवाय फारशा नावाजलेल्या नसलेल्या शाळांचा निकालदेखील १०० टक्के लागल्याचे दिसून आले.

‘शंभर नंबरी’ शाळा
१.विद्याव्हॅली नॉर्थ पॉइंट कनिष्ठ महाविद्यालय, चिखली
२.के. जे. गुप्ता कनिष्ठ महाविद्यालय, चिंचवड
३.अमृता विद्यालय, निगडी
४.एसएनबीपी, मोरवाडी
५.कमलनयन बजाज चिंचवड
६.सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, कुदळेवाडी
७.होलीझोन इंग्लिश मीडियम स्कूल, दिघी
८.अभिषेक विद्यालय, शाहूनगर
९.पी. बी. जोग स्कूल, चिंचवड
१०.स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम, भोसरी
११.सेंट ॲन्स कनिष्ठ महाविद्यालय, त्रिवेणीनगर -निगडी
१२.सिटी प्राईड कनिष्ठ महाविद्यालय, प्राधिकरण
१३.सुरेश मोरे उच्च माध्यमिक विद्यालय, रावेत
१४.केंब्रिज आर्ट, कॉमर्स, सायन्स, आकुर्डी
१५.नॉव्हेल कनिष्ठ महाविद्यालय, चिंचवड
१६.एसएनबीपी चिखली
१७. ज्ञानज्योती माध्यमिक उच्च माध्यमिक चिखली
१८. कॉमर्स, सायन्स ईन्फो
१९.एपीजे कॉलेज वाकड
२०.ओयॅसिस इंग्लिश मीडियम स्कूल, भोसरी
२१.एमएसएस हायस्कूल
२२. विश्‍वकल्याण इंग्लिश मीडियम शाळा, चिखली
२३.कॅम्प एज्युकेशन स्कूल निगडी
२४. नॉव्हेल व्होकेशनल कनिष्ठ महाविद्यालय