Wed, Sept 27, 2023

शस्त्र बाळगल्याप्रकरणी
तरुणाला पोलिस कोठडी
शस्त्र बाळगल्याप्रकरणी तरुणाला पोलिस कोठडी
Published on : 26 May 2023, 10:41 am
सोमाटणे, ता. २६ ः शिरगाव येथे अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्या तरुणाला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.
नवनाथ हरिभाऊ गोपाळे (वय ३६ रा. शिरगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस अमलदार समाधान फडतरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथ गोपाळे याच्याजवळ अवैध शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री सापळा रचून पवना नदीकाठी फिरत असलेला आरोपी नवनाथ गोपाळे याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी करता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व सात जिवंत काडतुसे आढळली. पोलिसांनी ती ताब्यात घेऊन नवनाथ गोपाळे याला अटक करून त्याच्याविरोधी गुन्हा दाखल केला. त्याला वडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. पुढील तपास पोलिस हावलदार तुकाराम साबळे करीत आहे.