
कोयत्याचा धाक दाखविणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
देहूरोड, ता. २६ः विकासनगर येथे कोयत्याचा धाक दाखवून कपड्याच्या दुकानातून कपडे आणि एक हजार रुपयाचा हप्ता घेऊन दोनजण फरारी झाले. गुरुवारी (ता. २५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. रोहन देशमुख (वय २२, रा. विकासनगर, देसाई कॅालनी, देहूरोड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. रफीक शेख आणि राकेश तेलगू अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी शेख आणि तेलगू यांनी फिर्यादीकडे फोन करून फुकट कपडे मागितले. मात्र, फिर्यादीने कपडे देण्यास विरोध केला. आरोपींनी दुकानात येऊन फिर्यादीचे पार्टनर एडविन यास शिवागीळ केली. दहशत पसरवून कोयत्याचा धाक दाखवून दुकानातून दोन जिन्स पॅन्ट, तीन शर्ट जबरदस्तीने चोरी करून नेले. तसेच गुगल पे द्वारे एक हजार रुपयांचा हप्ता नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींना अटक केलेली नाही. पोलिस उपनिरीक्षक ए. जे. ढमाळ तपास करीत आहेत.