तळेगाव दाभाडे येथे 
आरआरआर केंद्राची स्थापना

तळेगाव दाभाडे येथे आरआरआर केंद्राची स्थापना

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २७ : केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय दिल्ली यांच्या वतीने ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक स्थानिक संस्थांना रिड्यूस, रीयूज, रिसायकल सेंटर्स म्हणजेच आरआरआर केंद्र स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, तळेगाव दाभाडे नगरपरषिदेमार्फत दोन आरआरआर केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
केंद्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार तळेगाव दाभाडे शहरामध्ये नगरपरिषद कार्यालय आणि घनकचरा व्यवस्थापन केंद्र, मोरखळा अशा दोन ठिकाणी आरआरआर केंद्र २० मे पासून सुरू केली आहेत. या केंद्राचे उद्‍घाटन मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्याधिकारी ममता राठोड, कार्यालयीन अधीक्षक रवींद्र काळोखे, स्वच्छता निरीक्षक मयूर मासाळ, तुकाराम मोरमारे, प्रमोद फुले, शहर समन्वयक गीतांजली होनमने, रोहित भोसले, सुजाता घोडेकर तसेच इतर नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे, लहान मुलांची खेळणी आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यांचा पुनर्वापर करण्यासाठी केंद्र स्थापन करणे, तसेच या संकलित वस्तूंचे नूतनीकरण, पुनर्वापर किंवा नवीन उत्पादने तयार करून विविध भागधारकांना सुपूर्द करणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. या उपक्रमामुळे तळेगाव दाभाडे शहर स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी केले.

tas-२७-५-२३-P१
PNE23T45346

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com