Thur, October 5, 2023

भोसरीत गुरुवारी
करिअर शिबिर
भोसरीत गुरुवारी करिअर शिबिर
Published on : 27 May 2023, 10:56 am
पिंपरी, ता. २७ ः विद्यार्थ्यांना रोजगार, कौशल्य आणि उद्योजकता मार्गदर्शन मिळावे. तसेच, विविध शिष्यवृत्तींबाबत माहिती मिळावी, याकरिता भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून ‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर’ आयोजित केले आहे. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात (ता. १) सकाळी १० वाजता तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. आठवी ते बारावी आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी शिबिर आहे, अशी माहिती समन्वयक निखिल काळकुटे यांनी दिली.