Sun, Sept 24, 2023

पंडित नेहरू यांना पिंपरीत अभिवादन
पंडित नेहरू यांना पिंपरीत अभिवादन
Published on : 27 May 2023, 11:03 am
पिंपरी, ता. २७ ः देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस व नेहरूनगर येथील पुतळ्यास महापालिकेतर्फे पुष्पहार अर्पण करून अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी अभिवादन केले. महापालिकेतील कार्यक्रमास उपआयुक्त विठ्ठल जोशी, सहायक आयुक्त वामन नेमाने, प्रशासन अधिकारी सोनम देशमुख, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. तसेच, नेहरूनगर येथील कार्यक्रमास क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, माजी नगरसेवक राहुल भोसले, प्रशासन अधिकारी डी. डी. कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संजय धाडगे, अनिल यादव, राजेश बनपट्टे, संतोष लष्करे उपस्थित होते.