सहायक आयुक्तांच्या अंतर्गत नियुक्त्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहायक आयुक्तांच्या 
अंतर्गत नियुक्त्या
सहायक आयुक्तांच्या अंतर्गत नियुक्त्या

सहायक आयुक्तांच्या अंतर्गत नियुक्त्या

sakal_logo
By

पिंपरी, ता. २७ : पिंपरी चिंचवड शहर पोलिस दलातील नव्याने तसेच पदोन्नतीने हजर झालेल्या सहायक पोलिस आयुक्तांच्या पदस्थापना करण्यात आल्या. तसेच, तीन जणांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी शुक्रवारी (ता. २६) याबाबतचे आदेश दिले आहेत.
पिंपरी चिंचवड शहर पोलिस दलात नव्याने बदलीवर चार सहायक पोलिस आयुक्त हजर झाले आहेत. तसेच, हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांना सहायक पोलिस आयुक्त पदावर पदोन्नती मिळाली आहे. या पाच सहायक पोलिस आयुक्तांची अंतर्गत पद नियुक्ती करण्यात आली. आयुक्तालयातील अन्य तीन सहायक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

सहायक पोलिस आयुक्त (पदनियुक्तीचे ठिकाण) पुढीलप्रमाणे -
- विशाल हिरे (पिंपरी विभाग)
- राजेंद्रसिंह गौर (चाकण विभाग)
- बाळासाहेब कोपनर (विशेष शाखा)
- भास्कर डेरे (प्रशासन)
- विठ्ठल कुबडे (वाहतूक विभाग)
- प्रेरणा कट्टे (गुन्हे १)
- सतीश माने (गुन्हे २)
- पद्माकर घनवट (देहूरोड विभाग)