सवलतींचा लाभासाठी
३० जूनपर्यंत कर भरा

सवलतींचा लाभासाठी ३० जूनपर्यंत कर भरा

पिंपरी, ता. २९ ः महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महापालिकेने महिला बचत गटांना मिळकतकराची बिले वाटपाचे काम दिले आहे. त्यांनी पाच लाख ९७ हजार मिळकतींपैकी चार लाख ८० हजार बिले घरपोच दिली आहेत. उर्वरित बिले येत्या १०-१२ दिवसांत वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या दोन महिन्यांत एक लाख ३३ हजार १२५ जणांनी १६१ कोटी रुपयांचा करभरणा केला आहे. त्यासाठी करसंकलन विभागाची १७ कार्यालये, ऑनलाइन, विविध ॲपच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध आहे. वेळेत करभरणा करणाऱ्यांना विविध सवलत योजनांचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी मिळकतधारकांनी ३० जून पूर्वी कर भरावा. दरम्यान, एक लाखांपेक्षा अधिक कर थकबाकीदार २२ हजार मिळकतधारकांना जप्ती पूर्व नोटीस दिल्या आहेत. त्यांनी कर भरून कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com