भोसरीत शासकीय योजनांची ‘जत्रा’

भोसरीत शासकीय योजनांची ‘जत्रा’

पिंपरी, ता. २९ : सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ थेट आणि सुलभ व्हावा. यासाठी आमदार महेश लांडगे यांनी ‘शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून मतदारसंघातील जास्तीत-जास्त नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

अर्ज संकलनाची हेल्पलाईनवर माहिती
मतदार संघातील महापालिका प्रभागनिहाय या उपक्रमाचे आयोजन केले आहे. गुरुवारी (ता. १) या उपक्रमाची सुरुवात होणार असून, १५ जून रोजी एकत्रितपणे सर्व दाखल्यांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. या बाबत १२ जूनपर्यंत आमदार महेश लांडगे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय, शीतलबाग, भोसरी येथे अर्ज जमा करावेत. त्या-त्या प्रभागातील अर्ज संकलन केंद्राची माहिती मिळविण्यासाठी परिवर्तन हेल्पलाइन - ९३७९९०९०९० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दाखल्यांचे एकत्रित वाटप
संकलित झालेले अर्ज सरकारच्या संबंधित विभागाकडे पाठवून पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यानंतर १५ जून रोजी भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृह येथे सकाळी १० ते ५ या वेळेत दाखल्यांचे एकत्रितपणे लाभार्थ्यांना वाटप कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे मतदार संघातील अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

विनामूल्य मिळणार दाखले
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून उत्पन्नाचा दाखला, नवीन मतदार नोंदणी, रहिवासी दाखला, सातबारा, ८-अ वाटप, जातीचा दाखला (फक्त हवेली तालुक्यासाठी), वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व दाखला (डोमिसाईल), ३३ टक्के महिला आरक्षण दाखला, ज्येष्ठ नागरिकत्व दाखला, आधार कार्ड नवीन दुरुस्ती व अपडेट करणे, मतदान कार्ड आधारकार्डशी लिंक करणे, रेशनकार्डवरील नाव कमी करणे, रेशनकार्डवरील नाव वाढवणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक दाखला (खुल्या प्रवर्गाकरिता), नॉन क्रिमीलेअर, उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबतचा दाखला एकाच छताखाली मिळणार आहे. विशेष म्हणजे, या दाखल्यांसाठी नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक अनिकेत गायकवाड यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com