यंदा तरी महापालिका शाळेत 
जायला बससेवा मिळणार का?
जायला बससेवा मिळणार का?

यंदा तरी महापालिका शाळेत जायला बससेवा मिळणार का? जायला बससेवा मिळणार का?

पिंपरी, ता. ३० ः गेल्या वर्षभरापासून रावेत, पुनावळे आणि किवळे भागातील शालाबाह्य विद्यार्थी बससेवेअभावी शाळेपर्यंत पोहचू शकत नव्हते. त्यामुळे हजारो विद्यार्थी शालाबाह्य झाली आहेत. या बाबत आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे पालकांनी गाऱ्हाणे मांडले आहे.
कोरोना महामारीपूर्वी या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या शाळेत येण्यासाठी बससेवा उपलब्ध होती. परंतु आता महापालिकेकडून ही बससेवा उपलब्ध करून न दिल्याने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात वंचित मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. महापालिकेची शाळा वस्तीपासून सुमारे अडीच ते तीन किलोमीटर दूर आहे. सुरक्षेच्या कारणाने सहा वर्षांच्या लहान मुलांना पायी शाळेत जाणे शक्य होत नाही. अशीच या मजुरांची मुलांना शिकवायची मानसिकता नाही. आम्ही पालक समुपदेशन करून मुलांचा पाया तयार करून त्यांना महापालिकेच्या शाळेपर्यंत पोहोचवत आहोत. परंतु बससेवा नसल्यामुळे ही मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

सहगामी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राजक्ता रूद्रवार म्हणाल्या,‘‘ किमान यावर्षीतरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नका. गेल्या वर्षी नऊ महिने पाठपुरावा घेऊनही काहीही उपयोग झाला नाही. कृपया असे होऊ देऊ नका. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात मुलांना शिक्षणापासून वंचित करू नका हीच एक मागणी आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com