Sat, Sept 30, 2023

पाऊसाची हजेरी
पाऊसाची हजेरी
Published on : 31 May 2023, 2:58 am
सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी
पिंपरी, ता. ३१ : शहरात सलग तिसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली. दुपारी चारच्या सुमारास विजेच्या कडकडांटसह कोसळला. अचानक कोसळलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. बहुतेक भागात वाहतूक कोंडी झाली होती.
बुधवारी शहराच्या मध्यवर्ती भागापेक्षा उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. अनेक ठिकाणी झाडे कोसळले. परिणामी विजांच्या ताराही ठिकठिकाणी तुटल्याचे चित्र होते. यामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी गारांसह पाऊस झाला. उंच सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. समर्थ कॉलनी, विकासनगर किवळे परिसरात सायंकाळी साडेसहा वाजता गारांचा पाऊस झाला. दापोडी परिसरातही पाऊस झाला.