पुणे-मुंबई महामार्गालगची अतिक्रमणे हटविली

पुणे-मुंबई महामार्गालगची अतिक्रमणे हटविली

सोमाटणे, ता. २ ः पुणे-मुंबई महामार्गालगतची सोमाटणे येथील अतिक्रमणे हटविण्यात आली. यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली आहे. पुणे-मुंबई महामार्गालगत शंकरवाडी ते तळेगाव खिंड दरम्यान जाहिरात फलक, भाजीपाला-फळे विक्रेत्यांनी अतिक्रमण करून बांधकामे केली होती. या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. जाहिरात फलक रस्त्यावर कोसळून अपघाताची भीती होती. परंतु, किवळे येथील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर रस्ते विकास महामंडळांनी तत्परता दाखवली आहे. त्यांनी तातडीने शंकरवाडी ते तळेगाव खिंड दरम्यान असलेली अतिक्रमणे हटविण्याचे काम हाती घेतले. गेल्या तीन आठवड्यात रस्त्यालगतचे सर्व जाहिरात फलक व अतिक्रमण ठरणारी बांधकामे तोडण्यात आली आहेत. तसेच, तोडलेल्या बांधकामामुळे रस्त्यालगत पडलेला राडारोडा हटविण्याचे कामही पूर्ण झाले आहे.

PNE23T46647

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com