Thur, Sept 28, 2023

बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी-चिंचवडला
चार सुवर्ण आणि पाच रौप्य पदके
बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी-चिंचवडला चार सुवर्ण आणि पाच रौप्य पदके
Published on : 9 June 2023, 11:36 am
पिंपरी, ता. ९ ः पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या मान्यतेने दादाजी कोंडदेव पुरस्कार विजेते अजितसिंग वनेचर यांच्या गौरवार्थ आयोजित जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी-चिंचवडमधील एसएमबीसी क्लबच्या खेळाडूंनी चार सुवर्ण व पाच रौप्य पदके पटकावली. खडकीतील लाल बहाद्दुर शास्त्री विद्यालयाच्या मैदानावर स्पर्धा झाली. त्यात मल्हार कपिले, श्रवण गुडेकर, फवाद संगे, सोहम जाधव यांनी सुवर्ण आणि वैभव साबळे, रोहित नरवडे, राखी घाडगे, अनुराधा शिरगिरे व सोमनाथ कांबळे यांनी रौप्य पदक पटकावले. त्यांना सुकन्या सुर्वे व बळवंत सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले. माजी नगरसेवक समीर मासुळकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.