जीवन सुसह्य करण्यासाठी परिषदेच्या व्यासपीठाचा उपयोग करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीवन सुसह्य करण्यासाठी
परिषदेच्या व्यासपीठाचा उपयोग करा
जीवन सुसह्य करण्यासाठी परिषदेच्या व्यासपीठाचा उपयोग करा

जीवन सुसह्य करण्यासाठी परिषदेच्या व्यासपीठाचा उपयोग करा

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ९ ः जीवन सुसह्य करण्यासाठी तरुण पिढीतील अभियांत्रिकी संशोधकांनी संवाद आणि माहिती प्रक्रियेसाठी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या व्यासपीठाचा पुरेपूर उपयोग करावा. शैक्षणिक संशोधक, अभियंते आणि उद्योग तज्ज्ञांना त्यांची नवीनतम कार्यकौशल्ये, तांत्रिक प्रगती आणि अभिनव उत्पादनांना सादर करण्यासाठी हे खुले व्यासपीठ संधी देईल, असे मत माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.

येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (एनसीईआर) मध्ये आयोजित दोन दिवसीय इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कम्युनिकेशन अॅण्ड इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग (ICCIP-२०२३) च्या पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्‍घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशनचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर एनसीईआरचे चेअरमन राजेश म्हस्के, खजिनदार नंदकुमार शेलार, प्राचार्य डॉ. विलास देवतरे तसेच परिषदेच्या मुख्य संयोजक प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे व डॉ. दिग्विजय पाटील आदी उपस्थित होते.

या परिषदेत भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, पोलंड, मलेशिया, नायजेरिया, अमेरिका आणि इराक या सात देशातील संशोधकांसह देशातील बहुतांश राज्यातील विद्यार्थी आणि अभियांत्रिकी संशोधकांनी भाग घेतला आहे. त्यांचे एकूण २०७ शोधनिबंध सादर केले जाणार असल्याची माहिती डॉ. पांडे यांनी प्रास्ताविकात दिली.
प्रमुख पाहुणे रावळ म्हणाले, की संशोधकांनी केवळ एकाच विषयापुरते केंद्रित न होता सर्वसमावेशक अभ्यास करावा. तंत्रज्ञानातील झपाट्याने होणाऱ्या बदलांना अनुभवण्यासाठी लवकरात लवकर सुरुवात करावी. ग्राहकांच्या गरजा ओळखून सहज वापरता येणाऱ्या उत्पादनांची निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित करावे.
दरम्यान, आयसीसीआयपी २०२३ पुस्तिकेचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना उद्यमी करण्यासाठी होत असलेल्या प्रकल्पांची माहिती एनसीईआरचे चेअरमन राजेश म्हस्के यांनी यावेळी दिली. प्रा. उमा पाटील यांनी आभार मानले.

PNE23T48087