दहावीनंतर काय? आजच जाणून घ्या

दहावीनंतर काय? आजच जाणून घ्या

सकाळ विद्या व क्यू आर कोड शुक्रवार टुडे पान एकवरून घ्यावा
--

दहावीनंतर काय? आजच जाणून घ्या

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात चर्चासत्र

पिंपरी, ता. ९ ः नवीन शैक्षणिक धोरण, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि दहावीनंतरचे उच्च शिक्षण याबाबत, विद्यार्थी व पालकांसाठी ‘सकाळ विद्या’ आणि ‘क्रिएटिव्ह ॲकॅडमी व ‘लर्निंग लेन्स ॲकॅडमी यांच्यातर्फे शनिवारी (ता.१०) चर्चासत्र आयोजित केले आहे. याचा लाभ सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनाही होणार आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी सायंकाळी पाच वाजता चर्चासत्रास सुरवात होईल. शालेय अभ्यासक्रम, मूल्यमापन पद्धत, विषयानुरूप योग्य नियोजन व आकलनावर भर असेल. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिकांचे स्वरूप कसे असेल, या अनुषंगाने अभ्यास व वेळेचे नियोजन कसे असावे, अभ्यास कसा करावा, परीक्षेचे ओझे न बाळगता कसे सामोरे जावे, याविषयी समुपदेशन केले जाणार आहे. क्रिएटिव्ह ॲकॅडमीचे नौशाद शेख आणि लर्निंग लेन्स ॲकॅडमीचे इम्रान शेख मार्गदर्शन करतील. दहावीनंतर मेडिकल, इंजिनिअरिंग याव्यतिरिक्त उपलब्ध करिअरचे पर्याय व अन्य परीक्षा, त्यांची तयारी व नामांकित शिक्षण संस्था याविषयीही मार्गदर्शन मिळेल.

काय? कधी? केव्हा? कुठे?
काय? ः दहावीनंतरचे शिक्षण विषयावर चर्चासत्र
कधी? ः शनिवार, ता. १० जून
केव्हा? ः सायंकाळी ५ वाजता
कुठे? ः प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

संपर्क : ८३७८९८७८३६, ९९२२२४७५५६
प्रवेश ः विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य, नावनोंदणी आवश्यक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com