जयहिंद महाविद्यालयात
मराठी भाषेविषयी कार्यक्रम

जयहिंद महाविद्यालयात मराठी भाषेविषयी कार्यक्रम

पिंपरी, ता. २३ ः जय हिंद महाविद्यालयात मराठी विभागाच्यावतीने मराठी भाषा पंधरवडा दिन साजरा करण्यात आला. गायत्री इंगळे आणि रिया शिंदे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक नाटिका सादर केली. त्याचबरोबर वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे नव्या पिढीचे व जुन्या पिढीचे विचार यावर एक नाटक सादर केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या ज्योती मसन, उपप्राचार्या बिंदू जोस, पर्यवेक्षिका सुनीता मेहरा उपस्थित होत्या. प्रा. राजकुमार भोसले यांनी मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. प्रा. धनंजय ठोके यांनी कुसुमाग्रज यांच्या जीवनाविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच प्रा. कदम यांनी मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे, यासाठी आपण काय करावे, हे विद्यार्थ्यांना सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध विषयावरच्या कविता तसेच मराठी भाषेबद्दल मनोगत व्यक्त केले. त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाविद्यालयातील विद्यार्थिनी सृष्टी गायकवाड, नम्रता पाटील व वैष्णवी धुमाळ यांनी समूहगीत सादर केले. स्वराली कदम, श्रावणी शिंदे, भूषण धुपे, अनुष्का वेदपाठक, श्रावणी राऊत यांनी कविता सादर केल्या. दिव्या थोरवे, साक्षी आदक, राहुल गायकवाड, अतिश ठोंबरे, सिद्धी पिसाळ, यांनी भाषण सादर केले. प्राध्यापक किरण घाटबांधे यांनी आपल्या सुमधुर आवाजात एक गीत सादर केले. या कार्यक्रमास प्रा. भालचंद्र पवार, प्रा. मीनाक्षी पाटील, मीनाक्षी शिळीमकर, प्रा. अशोक रूपनर आदी उपस्थित होते.
मराठी विभाग प्रमुख प्रा. धनंजय ठोके यांनी प्रास्ताविक केले. वैष्णवी भाट, सुहानी गायकवाड, श्रावणी शिंदे, सायली शहा यांनी सूत्रसंचालन केले.
फोटोः 20307

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com