तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
भोसरी, ता. ९ ः पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या आरोपीला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. ही कारवाई मंगळवारी (ता. ८) सायंकाळी पावणे आठच्या सुमारास तापकीरनगर, मोशी येथे करण्यात आली.
भूषण गणेश बहिरट (वय २१, रा. मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार आनंद जाधव यांनी ‘एमआयडीसी’ भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी भूषण बहिरट याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. त्याने स्वतःकडे एक शस्त्र बाळगले असल्याची माहिती एमआयडीसी भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भूषण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

