सरकारनामा पै. दिपक भाऊ रोकडे

सरकारनामा पै. दिपक भाऊ रोकडे

Published on

विकासाची दृष्टी असलेला समाजसेवक पै. दीपक रोकडे


देशाच्या लोकसंख्येतील सर्वात महत्त्वाचे आणि चैतन्यपूर्ण घटक म्हणजे विद्यार्थी युवक आहेत. आपले राष्ट्र ऐतिहासिक लोकसंख्येच्या बदलाचे साक्षीदार आहे. जगातील इतर राष्ट्रांच्या समुदायांमध्ये आपले योग्य स्थान निर्माण करण्याची भारत देशाची क्षमता एक राष्ट्र म्हणून आपल्या देशातील युवक विद्यार्थी यांच्या सुप्त शक्तींचा किती योग्य वापर करू शकतो, यावर अवलंबून आहे. निर्व्यसनी सुदृढ समाज घडविण्यासाठी जे घडावे असे वाटते ते घडविण्यासाठी आपणच आपले पहिले पाऊल उचलले पाहिजे, ही दूरदृष्टी घेऊन राज्यस्तरीय कुस्ती खेळाडू पैलवान दीपक रोकडे हे गेली दोन दशकांपासून पिंपरी व जिल्ह्यात काम करत आहेत.
- रमेश मोरे

त ळागाळातील सर्वसामान्यांसाठी गेली दोन दशकांपासून विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रमाद्वारे त्यांची समाजाशी नाळ जोडलेली आहे. पिंपरी-चिंचवड शहर कर्मभूमी असल्याने शहरातील निर्व्यसनी तरुणांची संघटनात्मक मोठी फळी त्यांनी उभी केलेली आहे. आपण समाजाचे देणे लागतो, या निःस्वार्थ भावनेतून त्यांनी पर्यावरण, शिक्षण, संस्कार सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी व्यासपीठ मिळावे या उद्देशाने नवभारत युवक विकास प्रतिष्ठान हे सामाजिक व्यासपीठ तर बुस्ट एज्युकेशन ॲकॅडमी या शैक्षणिक व्यासपीठावरून ते काम करत आहेत.

उमदे तरुण व्यक्तिमत्त्व
पर्यावरण संवर्धनासाठी निसर्गधरा पर्यावरण संवर्धन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गेली दोन दशकांपासून शहर व जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनाची कास धरलेली आहे. बालपणापासून त्यांनी कुस्ती या खेळाला प्राधान्य देऊन स्वतः इतरांना व्यायाम व खेळाचा आदर्श निर्माण करून दिला आहे. ते राज्यस्तरीय कुस्ती खेळाडू आहेत. कुस्ती गुरू वस्ताद दत्तात्रेय कंद यांच्या तालमीत त्यांनी कुस्तीचे डावपेच शिकत राज्यस्तरीय कुस्ती खेळाडू म्हणून नावलौकिक केलेले आहे. कर्मभूमी पिंपरी येथील नवमहाराष्ट्र महाविद्यालय येथे त्यांचे शिक्षण झाल्याने संपूर्ण पिंपरी -चिंचवड शहर व जिल्ह्यात त्यांची पैलवान अशी ओळख आहे.

हाकेला धावून जाणारा माणूस
उद्योगनगरी व स्मार्ट पिंपरी-चिंचवड म्हणून ओळख असलेल्या शहराला कष्टकऱ्यांची कामगारनगरी म्हणून ओळखले जाते. शहर घडविण्यासाठी यात अगणित कष्टकऱ्यांचे योगदान लाभलेले आहे. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर हे दीपक रोकडे यांचे मूळ जन्मगाव. तर कर्मभूमी पिंपरी, येथूनच त्यांनी बी.कॉमपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले आहे. वडील सौदागर रोकडे हे व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टर व खासगी कंपनीत नोकरीस होते. आई गृहिणी सुवर्णा सौदागर रोकडे असून, पिंपरीतील वैभवनगर येथे या कुटुंबाचे वास्तव्य आहे. विद्यार्थिदशेपासूनच त्यांनी पर्यावरण अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती जनजागृती स्वच्छता अभियान वृक्षसंवर्धन या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून कामास सुरुवात केली. माणसे जोडत त्यांनी पिंपरी-चिंचवड व संपूर्ण जिल्ह्यातून नवभारत युवक विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक युवकांची मोठी फळी उभी केली आहे. याचबरोबर बुस्ट एज्युकेशन सोसायटीचे संचालक आहेत. शैक्षणिक क्षेत्रात बुस्ट एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांचे मोठे योगदान आहे.

विकासाची दूरदृष्टी
आपले पिंपरी-चिंचवड शहर बेस्ट सिटी व कामगारांची उद्योगनगरी म्हणून शहराचा नावलौकिक असला तरी अन्य भागाच्या मानाने पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. झोपडपट्टी पुनर्वसन विकास, रस्ते, पिण्याचे पाणी, झोपडपट्टी पुनर्वसन विकास प्रकल्प प्रश्न, सोडविण्यासाठी या पुढील काळात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेस्ट सिटी म्हणून पिंपरी व शहराची ओळख संपूर्ण जगभरात होईल, असे शहरात काम करायचे आहे. सामाजिक कामाबरोबरच राजकीय व्यासपीठाद्वारे प्रश्न सोडविण्यासाठी नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून शहरात पक्षाची संघटनात्मक बांधणी केली आहे.

सुदृढ समाज निर्माणाचे कार्य
पैलवान दीपक रोकडे हे विविध सामाजिक संस्था, संघटना, मंडळ,
ट्रस्ट, महिला बचत गट यांच्याशी उत्तम समन्वय व संपर्क साधून आहेत. युवकांमध्ये सामाजिक प्रबोधन व्हावे त्यांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी रोकडे यांनी डॉ. अनिल अवचट यांच्या संस्थेच्या माध्यमातून पिंपरी, आकुर्डीतील विविध महाविद्यालयांमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती शिबिरे आयोजित केलेली आहेत. आपले सण, उत्सव, संस्कृती याची जपणूक व्हावी व बालवयातच याविषयी विद्यार्थ्यांवर संस्कार घडावेत म्हणून विविध शाळांमधून बालसंस्कार शिबिरे, किल्ले बनवा स्पर्धा, असे उपक्रम शिववंदना ग्रुपच्या वतीने आयोजित केलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तसेच फुले-शाहू-आंबेडकर या महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. भारत युवक विकास परिषदेच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा शिवकालीन मर्दानी खेळांना प्रोत्साहन देत युवक युतीचे सक्षमीकरण करीत समाजप्रबोधन करण्याचे उपक्रम राबविलेले आहेत. महिलांमध्ये उद्योजकता वाढीस लागावी या उद्देशाने महिला बचत गटांना सण, उत्सव काळात विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी स्टॉल उपलब्ध करून देऊन त्यांना मदत व प्रोत्साहन दिले आहे. सांस्कृतिक क्षेत्रात देखील त्यांचा उत्तम संपर्क आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी सामाजिक उपक्रम राबवले आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन बलिदान दिनानिमित्त वडू बुद्रुक तुळापूर ते पिंपरीपर्यंत शक्ती शौर्य ज्योत यात्रा काढून त्यांनी युवक संघटन उभारले आहे. शिवजयंती तथागत गौतम बुद्ध जयंती ते महात्मा जोतिराव फुले यांची जयंती या काळात नवभारत युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात. हे कार्य अविरत सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com