सकाळ संवाद
पथदिव्यांची दुरुस्ती करावी
निगडी ः भक्ती-शक्ती चौकातून पुणे-मुंबई महामार्गावरून देहूरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दिवे नादुरूस्त असल्याने रात्रीच्यावेळी अपघाताच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे महापालिकेने या रस्त्यावरील पथदिव्यांची तत्काळ दुरुस्ती करावी.
-महेश मोरे, निगडी
PNE25V62281
उंदीर-घुशींचा नायनाट आवश्यक
निगडी ः निगडी गावठाण परिसरात उंदीर आणि घुशीचा उपद्रव वाढला आहे. गाड्यांच्या पेट्रोल ट्युब, वायरिंग हार्नेस, बॅटरी केबल्स कुरतडण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे विद्युत शॉर्ट सर्किट होऊन गाड्यांना आगही लागू शकते आणि गंभीर अपघात होऊ शकतात. त्यामुळे सापळे लावून उंदीर घुशी पकडून त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे. याबाबतीत कीटकनाशके, गोळ्या दुरुपयोगी ठरत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन आवश्यक कारवाई करणे गरजेचे आहे.
-शिवराम वैद्य, निगडी
PNE25V62282
सृष्टी चौकातील पदपथावर झाडाचा राडारोडा
पिंपळे गुरव ः सृष्टी चौकातील जगताप उद्यानालगतच्या पदपथावर झाड पडले होते. अग्निशमन दलाने ते कापून पदपथावर ठेवले आहे, परंतु पाला व फांद्याचा राडारोडा तसाच पडून आहे. ज्येष्ठ नागरिक उद्यानामध्ये व्यायामासाठी व चालण्यासाठी येतात पण या फांद्यांमुळे त्यांना पदपथावरून चालणे अवघड होत आहे, उद्यान विभागाने कर्मचारी पाठवून पदपथ स्वच्छ करावे.
-नितीन सोनवणे, पिंपळे गुरव
PNE25V62283
भरलेल्या कचरा गाडीमुळे नागरिक त्रस्त
पिंपळे निलख ः टकलेनगर मध्ये कचरा घेऊन जाणारी गाडी अनेक वेळा अगोदरच भरून येत असल्याने नागरिकांना कचरा टाकण्यासाठी जागा राहत नाही. प्रमाणापेक्षा जास्त कचरा गाडीत भरला गेल्यास तो रस्त्याने खाली पडत जातो. त्यामुळे पालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाने या समस्येची दखल घेऊन कचऱ्याची गाडी रिकामी आणि नियमित पाठवावी.
-सनी शिंदे, पिंपळे निलख.
PNE25V62279
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

