गुन्हे वृत्त
तडीपार गुंडाने चिखलीत
अपहरणातून उकळली खंडणी
पिंपरी : तडीपार केलेल्या गुंडाने एका तरुणाचे अपहरण करून दीड हजार रुपयांची खंडणी वसूल केली. चिखलीतील झेंडा चौक परिसरात हा प्रकार घडला. ऋषीकेश महारनवर (रा. साने कॉलनी, मोरेवस्ती, चिखली) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी विकास शर्मा (रा. झेंडा चौक, शिवकृपा सोसायटी, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपीने फिर्यादीला दूरध्वनीवरून धमकी देत त्याच्या भावाला ओलिस ठेवल्याचे सांगत पैशांची मागणी केली. त्यावर फिर्यादीने घाबरून दीड हजार रुपये दिले. त्यानंतर आरोपीने पुन्हा पैशांची मागणी केली. पुढील वेळेस पैसे न दिल्यास घरातील सर्वांना उचलून नेण्याची धमकी देत आरोपी पसार झाला.
-------
भोसरीत तरुणावर कोयत्याने वार
पिंपरी : भोसरीत पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. या प्रकरणी नरसिंह रसाळ (रा. मोहननगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सोन्या गुप्ता व अक्षय गोडसे (वय ३०, दोघेही रा. राणतारा कॉलनी, सद्गुरुनगर, भोसरी) यांना अटक केली, तर कुण्या आणि रोहन या नावाच्या इतर दोघांवर गुन्हा दाखल केला. आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्राला दांडक्यांनेही मारहाण केली.
----
दोन तरुणांना गट्टूने मारहाण
पिंपरी : जुन्या वादातून तिघांनी एक तरुण तसेच त्याच्या मावस भावाला सिमेंटच्या गट्टूने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पिंपरीतील भाटनगरमध्ये हा प्रकार घडला. झेबू ऊर्फ अब्रार शेख, टिपू ऊर्फ फयाज शेख (रा. भाटनगर, पिंपरी) आणि उज्वल लवे अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी भूपेंद्रसिंग चाळ (रा. आदर्श नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी मावस भाऊ नीलेश भोईटेसह गप्पा मारत उभे होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना मारहाण केली.
------------------------------
गांजा बाळगल्याने एकाला अटक
पिंपरी : गांजा विक्रीसाठी बाळगलेल्या एकाला पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली. ही कारवाई हिंजवडी येथील बेंद्रे वस्तीत करण्यात आली. मोहमद सय्यद (रा. विनोदे वस्ती, वाकड, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ७५८ ग्रॅम वजनाचा ३७ हजार ९०० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

