उच्च सुरक्षा ‘नंबर प्लेट’कडे पाठ

उच्च सुरक्षा ‘नंबर प्लेट’कडे पाठ

Published on

पिंपरी, ता. २७ : उच्च सुरक्षा वाहन क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याच्या कामामध्ये गती येण्यासाठी परिवहन विभागाने आता एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांचे हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पत्ता बदल यासह विविध कामांना ‘ब्रेक’ लावण्याचा निर्णय घेतला. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी १६ जून रोजी याबाबत निर्देश दिले. पण, त्यानंतही ‘एचएसआरपी’ बसविण्याकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे. पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हद्दीतील २७ ऑक्टोबरपर्यंत सरासरी ३५ टक्के वाहन चालकांनी ही नवीन नंबर प्लेट बसविली आहे.

या उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसविण्यासाठी एक जानेवारीपासून सुरुवात झाली. यासाठी परिवहन विभागाने तीन खासगी कंपन्यांची नियुक्ती केली आहे. पिंपरी चिंचवड आरटीओत एकूण २४ लाख वाहनांची नोंद आहे. यात १५ लाख ३९ हजार वाहने ही २०१९ पूर्वीची आहेत. यापैकी २७ ऑक्टोबरपर्यंत पाच लाख २१ हजार ५८१ जणांनी ‘एचएसआरपी’साठी नोंद केली आहे. तर तीन लाख ९० हजार ५०९ वाहन चालकांनी ही नंबर प्लेट बसविली आहे. हा अल्प प्रतिसाद लक्षात घेता परिवहन विभागाने जुन्या वाहन चालकांची विविध कामे थांबविण्याचा निर्णय १६ जूनला घेतला. पण, त्यानंतरही ी कार्यवाही मंदावलेलीच आहे. पिंपरी चिंचवड ‘आरटीओ’ हद्दीतील केवळ ३५ टक्केच वाहन चालकांनी ‘एचएसआरपी’ बसविली आहे. यासाठी ३० नोव्हेंबर मुदत आहे. मुदत संपायला एक महिना शिल्लक राहिला आहे. या काळात ६५ टक्के वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवून होणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

उच्च सुरक्षा नंबर प्लेटसाठी ३० नोव्हेंबरची मुदत आहे. वाहन चालकांनी विहित मुदतीत ‘एचएसआरपी’ बसवून घ्यावी. या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याबाबत परिवहन आयुक्त हे निर्णय घेतील.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

‘एचएसआरपी’ नोंदणी - फिटींग
३० मेपर्यंत - २,५७,५६५ - १,२९,६३७
२८ जुलैपर्यंत - २८६,६८३ - २,५१,१२५
१३ ऑगस्टपर्यंत - ४,३९,६९७ - २,७८,९६६
२७ सप्टेंबरपर्यंत - ५,२१,५८१ - ३,९०,५०९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com