गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

सिगारेट दिली नाही म्हणून
हातगाडी चालकाला मारहाण
पिंपरी : मोरवाडी चौकात एका हातगाडी चालक तरुणाने सिगारेट दिली नाही म्हणून दोन जणांनी त्याला काठी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. भाई असल्याचे सांगत आरोपींनी हल्ला केला. याप्रकरणी मोहमद जाफर अबरार शेख (रा. म्हाडा के बिल्डिंग, अजमेरा, पिंपरी) यांनी फिर्याद दिली. त्यांनी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. त्यावरून कुंदन गायकवाड (रा. अजमेरा म्हाडा, मोरवाडी) व अभिषेक दिलीप भोसले (रा. लालटोपी नगर, मोरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी धमक्या देत दहशत निर्माण केली.
-----

जमीन व्यवहारात फसवणूक
पिंपरी : जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक केल्या प्रकरणी कासारसाईमध्ये एकावर गुन्हा दाखल झाला. धनंजय कृष्णा वाडकर असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी परवेज मकबूल इनामदार-मुलाणी (रा. दापोडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. फिर्यादी व त्यांच्या भावाकडून आरोपींनी कासारसाईतील जमिनीची विक्री करून देतो असे सांगत पैसे घेतले. त्यानंतर खरेदीखत न करता आरोपीने तीच जमीन इतरांना विकली. त्यामुळे फिर्यादी व त्यांच्या भावाची फसवणूक झाली.
-----

सदनिका विक्रीच्या व्यवहारात गंडा

पिंपरी : सदनिका विक्रीच्या व्यवहारात गंडा घातल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी नवी सांगवीतील आदर्श नगरमधील ५१ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी एका महिलेसह दीपक रमेश मोरे, जितेंद्र रमेश मोरे (सर्व रा. भूगाव, मुळशी) अशा तीन जणां‍वर गुन्‍हा दाखल केला. आरोपींनी माणमधील सदनिका विकायची असल्याचे सांगून फिर्यादी आणि साक्षीदार आणखी एका साक्षीदार महिले‍कडून ४९ लाख २१ रुपये घेतले. त्यानंतर सदनिकेचा ताबा न देता त्यांनी पैशाचा अपहार केला. रक्कम परत देण्याबाबत समजुतीचा करारनामा करून आरोपींनी पुढील तारखेचे धनादेश दिले, मात्र त्यांच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश वटलेच नाहीत.
---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com