रात्रीत ‘खेळ’ चाले रस्ते सफाईचा
पिंपरी : महापालिकेने यंत्राद्वारे मोठ्या रस्त्यांच्या स्वच्छतेचे धोरण अवलंबले आहे. शिवाय, आता मजुरांद्वारे रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत रस्ते सफाई सुरू केली आहे. तरीही सकाळी विशिष्ट ठिकाणी कचरा पडलेला दिसतो. अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ६३ (२) आणि ६६ (३) अन्वये शहरातील कचरा साफ करणे, त्याची वाहतूक करणे, त्याची शास्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे महापालिकेचे कर्तव्य आहे. त्यानुसार महापालिका ओला म्हणजे कुजणारा कचरा, सुका म्हणजे न कुजणारा कचरा आणि पुन्हा वापरता येण्यासारखा कचरा असे वर्गीकरण करून संकलन करीत आहे. यामध्ये घरगुती कचऱ्यासह उपहारगृह, हॉटेल्स, कत्तलखाना, फुलबाजार, फळे व भाजीपाला बाजार, बांधकामांचा राडारोडा अशा पद्घतीने वर्गीकरण करून संकलित केलेला कचरा मोशी डेपोमध्ये नेला जात आहे. शिवाय, मोठे रस्ते यंत्राद्वारे आणि रात्री मनुष्यबळाद्वारे झाडून काढले जात आहेत. तरीही अनेक ठिकाणी काही नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.
दृष्टिक्षेपात कचरा
प्रतिदिन दरडोई निर्माण होणारा : ४०७ ग्रॅम
प्रतिदिन सरासरी निर्माण होणारा : १,४०० मेट्रिक टन
आरडीएफचे (रिफ्यूज-डिराइव्हड फ्युएल) प्रमाण प्रतिदिन : ७५१.४४ मेट्रिक टन
पुनर्प्रक्रियायोग्य कचरा प्रतिदिन : २७.५३ मेट्रिक टन
इतर कचरा : ६२१.०३ मेट्रिक टन
कचरा वाहक एकूण वाहने : ५२०
प्रतिदिन निर्माण होणारा कचरा
कचऱ्याचा प्रकार / वजन (टन)
बहुस्तरीय प्लॅस्टिक / ३९८.८६
जैवविघटनशील / ३८९.९
इनर्ट / १३.७२
गोणी पिशव्या / १३.८६
सॅनेटरी नॅपकिन / ४२.५६
नारळाचे कवच, लाकूड / १२७.८२
कागद / १६९.९६
चांबळे (पुनर्प्रक्रियायोग्य) / १७.०८
एचडीपीई (पुनर्प्रक्रियायोग्य) / ५६.९८
कापड / ११४.३८
ई-कचरा (पुनर्प्रक्रियायोग्य) / २.२४
सिरेमिक / १०.६४
नॉन फेरस (पुनर्प्रक्रियायोग्य) / १.४
घरगुती धोकादायक / २३.८
काच (पुनर्प्रक्रियायोग्य) / ३.२२
स्पंज / ९.९४
धातू (पुनर्प्रक्रियायोग्य) / १.६८
थर्मोकॉल (पुनर्प्रक्रियायोग्य) / १.९६
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

