गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

महिलेची ५५ लाख रुपयांना फसवणूक
पिंपरी : शेअर बाजारात ओटीसी ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर शंभर टक्के नफ्याचे आमिष दाखवून चिखलीतील ३७ वर्षीय महिलेची ५५ लाख २२ हजार ७९१ रुपयांना फसवणूक करण्यात आली. या महिलेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी एका महिलेसह इतरांवर गुन्हा दाखल केला. आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला गुंतवणुकीस प्रवृत्त केले. तिच्या विविध बँक खात्यांमधून रक्कम जमा करून घेण्यात आली. तिला कोणताही परतावा देण्यात आला नाही.
---------------
अल्पवयीन मुलाकडून पिस्तूल जप्त
पिंपरी : चिंचवडमधील गावडेनगर परिसरात पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अल्पवयीन मुलाकडून एक पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले. या भागातील पुलाजवळ एक जण संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपास करून पोलिसांनी १६ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले. झडतीत त्याच्याकडे ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल व ५०० रुपये किमतीचे काडतूस सापडले.
-----------------

संगणक अभियंत्याला ५९ लाखांना गंडा
पिंपरी : शेअर आणि आयपीओमधील गुंतवणुकीच्या नावाखाली वाकडमधील एका संगणक अभियंत्याला ५९ लाख ६५ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी शनी मंदिर मार्गावरील ४३ वर्षीय संगणक अभियंत्याने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. फिर्यादीला गुंतवणुकीनंतर १२ कोटी रुपयांचा नफा दाखविण्यात आला. फिर्यादीने रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना १५ टक्के कर भरण्यास सांगण्यात आले. फिर्यादीने नफ्यातूनच कर वजा करून घेण्यास सांगितले असता आरोपींनी नकार देऊन आणखी पैसे भरायला सांगितले. फिर्यादीला कोणतीही रक्कम परत करण्यात आली नाही.
----------------

गांजा बाळगल्याने एकावर गुन्हा
पिंपरी : वाकडमधील भुमकर चौकाजवळ विक्रीसाठी गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. कैलास उत्तम शिंदे (रा. भगवान नगर, भुमकर चौक, मूळ गाव बेलापूर, जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी भुमकर चौकाजवळ गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ९६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com