मैदानावर झोपलेली व्यक्ती
टेंपोखाली मृत्यूमुखी

मैदानावर झोपलेली व्यक्ती टेंपोखाली मृत्यूमुखी

Published on

पिंपरी, ता. २० : निगडीतील अंकुश चौकाजवळील मैदानावर झोपलेल्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. चालक सकाळी टेम्पो मागे घेताना चाक त्यांच्या अंगावरून गेले. संदीप देविदास नाटेकर (वय ४०, रा. पाचपीर चौक, काळेवाडी) असे मृताचे नाव आहे. ते नातेवाइकाकडे आले होते. त्यानंतर चौकाजवळील मोकळ्या मैदानात ते झोपले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिली. पोलिस टेंपोचालकाचा शोध घेत आहेत.
--------------

Marathi News Esakal
www.esakal.com