उद्यापासून नाट्य महोत्सवाला सुरुवात

उद्यापासून नाट्य महोत्सवाला सुरुवात
Published on

सकाळ नाट्यमहोत्सव ः लोगो
------------------------------

उद्यापासून नाट्य महोत्सवाला सुरुवात
उत्तमोत्तम नाटकांची पिंपरी चिंचवडकरांना मेजवानी

पिंपरी,ता. १० : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्या आहेत. यानिमित्त नातेवाईक व कुटुंबीय एकत्र आले आहेत. अशा वेळी कुटुंबीय व नातेवाईकांसह एकत्र वेळ घालविण्यासाठी, दैनंदिन आयुष्यातून ‘ब्रेक’ घेऊन तणावमुक्त होण्यासाठी नाटकासारखे दुसरे माध्यम नाही. ‘सकाळ’ नाट्य महोत्सवाच्या माध्यमातून अशीच लोकप्रिय व दर्जेदार नाटके पाहण्याची संधी नाट्य रसिकांना मिळणार आहे. १२ ते १४ एप्रिल या कालावधीत निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर हा नाट्यगृहात आयोजित केला आहे. महोत्सव कालावधीत दररोज रात्री नऊ वाजता नाट्य प्रयोगांना प्रारंभ होईल. उद्या (ता.१२) ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगाने नाटकाला सुरुवात होईल.

‘सकाळ माध्यम समूहा’च्यावतीने हा नाट्य महोत्सव भरविण्यात येत आहे. आपल्या रोजच्या कामातून वेळ काढून आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालविण्यासाठी आणि निखळ विनोदाचा आस्वाद घेण्यासाठी हा महोत्सव एक उत्तम पर्वणी असणार आहे. याद्वारे प्रशांत दामले, संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख, संदीप पाठक, हृषिकेश शेलार, अनघा भगरे, सुशील इनामदार, चिन्मय माहूरकर, समृद्धी मोहरीर आदी लोकप्रिय कलाकारांची सध्या गाजत असलेली नाटके शहरातील रसिकांना पाहता येणार आहेत. या नाट्य महोत्सवाचे ‘मिरॅकल’ हे ग्रुप प्रायोजक आहेत.

असे आहे नियोजन
काय : ‘सकाळ’ नाट्य महोत्सव
कुठे : ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी प्राधिकरण
कधी : १२ ते १४ एप्रिल
किती वाजता : रात्री ९ वाजता

महोत्सवातील नाटके
तारीख व वार / नाटक / कलाकार
१२ एप्रिल, शनिवार / नियम व अटी लागू / संकर्षण कऱ्हाडे व अमृता देशमुख
१३ एप्रिल, रविवार / वऱ्हाड निघालंय लंडनला / संदीप पाठक
१४ एप्रिल, सोमवार / शिकायला गेलो एक / प्रशांत दामले, समृद्धी मोहरीर, चिन्मय माहूरकर, सुशील इनामदार, अनघा भगरे, हृषिकेश शेलार

सवलतीच्या दरात तिकिटे (प्रतिव्यक्ती रुपयांत)
- सीझन तिकीट (तळमजला) : १२००
- प्रतिनाटक तिकीट (तळमजला) : ५००
- प्रतिनाटक तिकीट (बाल्कनी) : ४००

तिकीट बुकिंग सुविधा
ऑनलाइन : book my show
मोबाइल : ८९७५२३७०४१

महोत्सवाबाबत अधिक माहितीसाठी संपर्क : अक्षय - ९५६१३१४६७९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com