गळफास घेतलेल्या स्थितीत महिला आढळल्याने उडाली खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women Suicide
गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली महिला

गळफास घेतलेल्या स्थितीत महिला आढळल्याने उडाली खळबळ

पवनानगर - कोथुर्णे गावात झाडाला लटकलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बुधवारी (ता. ११) रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत हा मृतदेह आढळला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथुर्णे (ता. मावळ) गावच्या हद्दीत बुधवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास येथील शेतजमीन (गट नंबर ६७८) मध्ये असलेल्या आंब्याच्या झाडाला एक महिला (वय अंदाजे ३६ ते ४०, नाव पत्ता नाही) अंगावर गुलाबी रंगाची साडी, पायात पैंजण, जोडवे असलेल्या अशा वर्णनाची महिला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत मिळून आली. तरी या वर्णनाची महिला पोलिस स्टेशनवरील रेकॉर्डवर मिसिंग असल्यास तत्काळ कामशेत पोलिस ठाणे येथे (०२११४२६२४४०, ९७६४२२३२२६) या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आकाश पवार करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pvn22b00643 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top