विषबाधेमुळे मावळात चार जनावरांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विषबाधेमुळे मावळात
चार जनावरांचा मृत्यू
विषबाधेमुळे मावळात चार जनावरांचा मृत्यू

विषबाधेमुळे मावळात चार जनावरांचा मृत्यू

sakal_logo
By

पवनानगर, ता. १९ ः मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या लगत असलेल्या आपटी गेंव्हडे येथे विषबाधेमुळे चार जनावरांचा मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वर गणपत मोरे यांच्या चार जनावरांना विषबाधा झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले होते, मात्र त्यात त्यांना यश आले नाही.

एकीकडे शेतीच्या कामांना वेग आला आहे. पावसाळ्याच्या आधीच शेतकऱ्याचा सोबती असलेल्या बैलाचा मृत्यू झाल्यामुळे आता शेती करायची कशी, असा प्रश्न मोरे कुटुंबीयांसमोर उभा राहिला आहे.

या परिसरात नागरिकरण वाढले आहे. कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट न लावता आजूबाजूला कचरा टाकला जातो. तसेच झाडांवर औषध फवारणी करताना रिकाम्या बाटल्या कचऱ्यामध्येच टाकल्या असाव्यात. जनावरांनी हा कचरा खाल्ल्यामुळेच विषबाधा झाल्याचे मोरे यांचे म्हणणे आहे. सरकारने याची दखल घेत लवकरात नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ज्ञानेश्वर मोरे यांनी केली आहे.
--------------------------------