
कोथुर्णे सोसायटीच्या अध्यक्षपदी निंबळे यांची निवड
पवनानगर ता. १० : कोथुर्णे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी वारू येथील ज्ञानेश्वर निंबळे यांची तर उपाध्यपदी कोथुर्णे येथील वाघु दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कोथुर्णे गावांसह वारू, ब्राम्हणोली, तिकोना व गेव्हंडे या पाच गावांची महत्त्वाची समजली जाणारी कोथुर्णे सोसायटी मध्ये १९८१ ते आजपर्यंत भाजपची एकहाती सत्ता होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती खेचून आणली. शुक्रवारी (ता. १०) अध्यक्षपदाची व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये निंबळे यांची अध्यक्षपदी व तर उपाध्यक्षपदी दळवी यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी बाळासाहेब मसुरकर, गणपत काळे, यशवंत बोडके, लक्ष्मण काळे, बाळासाहेब दळवी, सीताबाई मोहोळ आदी संचालकांसह ॲड. नामदेव दाभाडे, नामदेव ठुले, मारुती काळे, नंदू धनवे, शिवाजी निंबळे, अनंता निंबळे उपस्थित होते. विजयानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यकर्त्यांनी गुलाल व भंडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला
PVN22B01295
Web Title: Todays Latest Marathi News Pvn22b00656 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..