ब्राम्हणोलीत युवकाचा पवना नदीत बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्राम्हणोलीत युवकाचा
पवना नदीत बुडून मृत्यू
ब्राम्हणोलीत युवकाचा पवना नदीत बुडून मृत्यू

ब्राम्हणोलीत युवकाचा पवना नदीत बुडून मृत्यू

sakal_logo
By

पवनानगर, ता. ४ : पवना नदीत ब्राम्हणोली येथे पोहण्यासाठी गेलेल्या काले येथील युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
कृष्णा भाऊ कालेकर (वय १७) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काले येथील तरुण कृष्णा कालेकर ब्रोम्हणोली येथील नदीपात्रात पोहण्यासाठी गेला. परंतु बराचवेळ तो घरी न आल्याने शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर त्याचे कपडे नदीपात्राबाहेर आढळून आली. त्यानंतर त्याचा मृतदेह शोधण्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. शिवदुर्गच्या सदस्यांनी दीड तासाच्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह दुपारी साडेबाराच्या सुमारास बाहेर काढला. त्याच्या मागे वडील, आई व आजी असा परिवार असून एकुलता एक असलेल्या मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने कालेकर परिवारावर व नातेवाईक यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विद्यार्थी पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेत दहावीत शिकत होता. शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे महेश मसने, राजेंद्र कडू, कुणाल कडू, हर्षल चौधरी, रतन सिंग, आकाश घरदाळे, वैष्णवी भांगरे, सागर कुंभार, दक्ष काटकर, यश वाडेकर, सचिन वाडेकर, अनिल आंद्रे, ओंकार कालेकर, सुनील गायकवाड आदींनी अथक परिश्रम घेतले. तर या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विजय गाले, संतोष शेळके हे करीत आहे.

कृष्णा कालेकर

Web Title: Todays Latest Marathi News Pvn22b00673 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top