मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ मावळात कडकडीत बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ
मावळात कडकडीत बंद
मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ मावळात कडकडीत बंद

मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ मावळात कडकडीत बंद

sakal_logo
By

पवनानगर, ता. ४ ः कोथुर्णे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ पवन मावळात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय नेत्यांकडून व सामाजिक संस्थेकडून घटनेचा निषेध करण्यात आला.
कोथुर्णे येथील अल्पवयीन मुलगी अपहरण व हत्या प्रकरणातील आरोपीला भरचौकात फाशी द्या, अशी मागणी आमदार उमा खापरे यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र देऊन, हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा व आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोथुर्णे गावातील सात वर्षीय मुलीचे दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. काल तिचा मृतदेह जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे आढळला होता. या प्रकरणी कामशेत पोलिसांनी आरोपीला २४ तासात अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र, या घटनेची संतप्त प्रतिक्रिया मावळात उमटली असून, आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी आज पवनानगर चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने महिला युवक रस्त्यावर उतरले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त करत काळे झेंडे व काळी फीत लावून कॅन्डल मोर्चा काढला. यावेळी आमदार उमा खापरे, माजी मंत्री बाळा भेगडे, गणेश खांडगे, ज्ञानेश्वर दळवी, किशोर भेगडे, नितीन घोटकुले, सायली बोत्रे, सचिन घोटकुले, नामदेव ठुले, बबलू तांबोळी, ज्ञानेश्वर दळवी, महादेव कालेकर, नितीन घोटकुले, विश्वनाथ जाधव, अमित कुंभार, ज्ञानेश्वर ठाकर, संजय मोहोळ आदींनी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा करण्याची मागणी केली. यावेळी पवनानगर बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला

पवनानगर चौक ः कोथुर्णे येथील घटनेच्या निषेधार्थ जमलेले आंदोलक.
01337, 01339, 01340

Web Title: Todays Latest Marathi News Pvn22b00674 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top