कोथुर्णे येथील पिडीत कुटुंबीयांची प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेऊन केले सांत्वन. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोथुर्णे येथील पिडीत कुटुंबीयांची प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेऊन केले सांत्वन.
कोथुर्णे येथील पिडीत कुटुंबीयांची प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेऊन केले सांत्वन.

कोथुर्णे येथील पिडीत कुटुंबीयांची प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेऊन केले सांत्वन.

sakal_logo
By

वंचित विकास, मनसेकडून
कोथुर्णेत भेट घेऊन सांत्वन

पवनानगर, ता. १० ः कोथुर्णे येथील घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पीडित कुटुंबाचे केले सांत्वन केले.
आंबेडकर म्हणाले, ‘‘समाजात काही मनोरुग्ण राहतात. त्यामुळे सरकारने यासाठी एक कायदा केला. परंतु समाजात असेही काही लोक फिरत असतात की त्यांना कोणता आजार आहे, हे लवकर लक्षात येत नाही. यावर कायदा करून अशा आरोपींना कडक कारवाई करण्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागात अशा घटना घडतात, हे दुदैवी आहे. गावपातळीवर यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. ही केस फास्टट्रँकमध्ये चालवून लवकरात लवकर आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी.’’ या वेळी पुणे जिल्हा पश्चिम जिल्हा अध्यक्ष कमलेश उकरंडे, मावळ तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ, राहुल इनकर, संतोष लोखंडे, सीमा भालेसेन, सारिका सिंग, वृषाली वीरगुजर, महेश परमार, मनीषा ओव्हाळ, रमेश ओव्हाळ उपस्थित होते.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेते प्रकाश महाजन यांनीही पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. प्रवक्ते गणेश सातपुते, सचिन चिखले हे समवेत होते. सातपुते म्हणाले, ‘‘स्वराच्या कायदेशीर व न्यायालयीन लढ्यासाठी गरज भासल्यास विशेष कायदे तज्ज्ञांकडून योग्य ते मार्गदर्शन पुरवले जाईल. नाराधमाला फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी मनसे मावळ तालुकाध्यक्ष रूपेश म्हाळसकर, सचिन भांडवलकर, सुशांत साळवी, भीमराव दळवी, अनिल वरघडे, सुरेश जाधव, संजय शिंदे, पांडुरंग असवले, भारत चिकणे, अमित भोसले, संदीप फोटफोडे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pvn22b00689 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..