पवना धरण शंभर टक्के भरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवना धरण शंभर टक्के भरले
पवना धरण शंभर टक्के भरले

पवना धरण शंभर टक्के भरले

sakal_logo
By

पवनानगर, ता. २० : पवना धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे धरण ९९. ९८ टक्के भरले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
ऑगस्टमध्ये पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे धरणातून ११ ऑगस्ट पासून ३५२० क्युसेकने पाण्याचा विसर्गदेखील करण्यात आला. आजमितीला धरणात ९९.९८ टक्के पाणीसाठा आहे. आज दिवसभरात परिसरात २८ मिलीलिटर पावसाची नोंद झाली असून धरणातील पाणीसाठा १०० टक्के झाला आहे. धरण परिसरात एक जूनपासून २ हजार १५७ मिमी पावसाची नोंद झाली आहे तर मागील वर्षी आजच्या तारखेला पवना धरणात ९६.६२ टक्के पाणी साठा झाला होता. धरणात सध्या ८.५१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता अशोक शेटे यांनी दिली. धरण भरल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने धरणातून सुरु असलेला विसर्ग बंद करण्यात आला होता. परंतु कालपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे तसेच आज पवना धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे जलविद्युत निर्मिती केंद्रातून १४०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अभियंता अशोक शेटे यांनी दिली.