पवना धरणातून १० हजार क्युसेकने विसर्ग सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवना धरणातून १० हजार क्युसेकने विसर्ग सुरू
पवना धरणातून १० हजार क्युसेकने विसर्ग सुरू

पवना धरणातून १० हजार क्युसेकने विसर्ग सुरू

sakal_logo
By

पवनानगर, ता. १७ : पवना धरणातून १० हजार क्युसेकने विसर्ग सुरू शुक्रवार (ता. १६) रोजी दुपारी १ वाजल्यापासून ७८०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. परंतु, पावसाची संततधार सुरूच राहिल्याने प्रशासनाने दुपारी तीन वाजल्यापासून सांडव्यातून ८६०० व पवना जलविद्युत निर्मिती केंद्रातून १४०० असा एकूण १०,००० क्युसेक विसर्ग करण्यात आला. त्यामुळे कोथुर्णे पूल पाण्याखाली गेला आहे. पाणी वाहत असल्याने त्यामुळे खबरदारी म्हणून परिसरातील शाळांना दुपारनंतर सुट्टी जाहीर करण्यात आली. तसेच काले येथील स्मशानभूमीचे निवारा शेड पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन धरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

गेल्या ४-५ दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच असल्याने पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पवना धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने दुपारी तीननंतर हा विसर्ग वाढवून १०, ००० क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस व धरणात येणारा येवा याचे प्रमाण बघून धरणातून सोडलेल्या विसर्गामध्ये वाढ करण्यात येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Pvn22b00702 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..