कोथुर्णे सरपंचपदी सोनवणे बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोथुर्णे सरपंचपदी 
सोनवणे बिनविरोध
कोथुर्णे सरपंचपदी सोनवणे बिनविरोध

कोथुर्णे सरपंचपदी सोनवणे बिनविरोध

sakal_logo
By

पवनानगर, ता. २५ : कोथुर्णे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अबोली सोनवणे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आली. सरपंच प्रमोद दळवी यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. निवडणूक अधिकारी म्हणून कालेचे मंडलाधिकारी प्रकाश बलकवडे, ग्रामसेवक शशिकांत तिडके व गावकामगार तलाठी सुप्रिया कावरे यांनी काम पाहिले.

यावेळी ‘रिपाइं’चे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, प्रमोद दळवी, सचिन दळवी, उपसरपंच रूपाली दळवी, पल्लवी फाटक, जुईली दळवी, शकुंतला वाघमारे, एकनाथ दळवी, अतुल सोनवणे, दाजीबाळ सोनवणे, राहुल सोनवणे उपस्थित होते.
निवडीनंतर ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून गावात मिरवणूक काढण्यात आली. निवडीनंतर सोनवणे म्हणाल्या की, ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. ग्रामस्थांनी दिलेल्या शब्दानुसार मला सरपंचपदासाठी संधी दिली आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना विचारात घेऊन गावच्या विकासासाठी प्रयत्न करीन.