येळसेत आढळली दुर्मिळ रानमांजराची पिल्ले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येळसेत आढळली दुर्मिळ रानमांजराची पिल्ले
येळसेत आढळली दुर्मिळ रानमांजराची पिल्ले

येळसेत आढळली दुर्मिळ रानमांजराची पिल्ले

sakal_logo
By

पवनानगर, ता. ७ : पवन मावळ येथील येळसे गावात भात खाचरात दुर्मिळ रानमांजराची पिल्ले आढळली आहेत. पोपट ठाकर हे आपल्या शेतात भात कापणी करत असताना त्यांना शेतात रानमांजराची तीन पिल्ले आढळली. त्यांनी त्वरित वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक नीलेश गराडे यांना माहिती दिली. त्यांनी याबाबतची माहिती वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांना दिली त्याच बरोबर त्यांनी आपली वन्य जीव रक्षक टीम येळसे या ठिकाणी तत्काळ पाठवण्यात आली. वन्यजीव रक्षक टीम यांनी घटनास्थळी जाऊन पिलांना ताब्यात घेतले. मांजराची पिल्ले सात ते आठ दिवसाची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले व त्यांनी अद्यापही डोळे उघडलेले नव्हते. त्यानंतर त्यांनी पिल्लांची प्राथमिक तपासणी केली. व पिल्ले ज्या ठिकाणी आढळली त्या ठिकाणी त्यांना पुन्हा सोडण्यात आले. रानमांजर ही अतिशय दुर्मिळ प्रजाती आहे. मावळ परिसरात ही अनेक वेळा ऊस तोडी सुरू असताना देखील आढळून आलेली आहे. या वेळी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे, शत्रुघ्न रासानकर, दक्ष काटकर, जिगर सोलंकी, अभिषेक बोडके, संतोष दहिभाते, नीलेश सुतार, प्रथमेश ठाकर उपस्थित होते.

येळसे ः येथे आढळले दुर्मिळ जातीचे मांजरांची पिल्ले.