लोहगडावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोहगडावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव
लोहगडावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव

लोहगडावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव

sakal_logo
By

पवनानगर, ता. ९ः श्री. शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच तसेच, लोहगड घेरेवाडी भाजे व पाटण ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी किल्ले लोहगडावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील मोठ्या उत्साहाने दीपोत्सव साजरा करण्यात आला. किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या शिवस्मारकावर सुंदर रांगोळ्या व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून भारत माता पूजन करण्यात आले. शिवस्मारक परिसर व लोहगड किल्ल्याच्या पायऱ्यांवर हजारो दिवे लावण्यात आले होते. त्यामुळे पौर्णिमेच्या चांदण्याबरोबर लोहगड किल्ल्याचा परिसर उजळून निघाला होता. सर्व परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोहगड सोसायटीचे चेअरमन गणेश धानिवले, सरपंच नागेश मरगळे, उपसरपंच गणपत ढाकोळ, पोलिस सचिन भोरडे, रमेश बैकर, राजू शेळके, शत्रुघ्न बैकर, बाळू ढाकोळ आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, मार्गदर्शक संदीप गाडे, विश्वास दौंडकर, तसेच, पिंपरी चिंचवड व कामशेत शहर गॅरेज असोसिएशनचे सदस्य यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी टाटा मोटर्सचे कर्मचारी श्री. भालकेश्वर यांचे वतीने आपत्कालीन कार्याबद्दल शिवदुर्ग मित्र लोणावळा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सदर सत्कार सुनील गायकवाड व त्यांच्या इतर सदस्यांनी स्वीकारला.