शालेय बस कोसळून आठ विद्यार्थी जखमी दुधिवरे खिंडीतील अपघात, पेणमधील सहल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय बस कोसळून
आठ विद्यार्थी जखमी
दुधिवरे खिंडीतील अपघात, पेणमधील सहल
शालेय बस कोसळून आठ विद्यार्थी जखमी दुधिवरे खिंडीतील अपघात, पेणमधील सहल

शालेय बस कोसळून आठ विद्यार्थी जखमी दुधिवरे खिंडीतील अपघात, पेणमधील सहल

sakal_logo
By

पवनानगर, ता. ४ ः लोहगड येथे फिरायला आलेल्या विद्यार्थ्यांची बस दुधिवरे खिंडीत कोसळून झालेल्या अपघातात आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले. पेणमधील खासगी क्लासची ७२ मुले व शिक्षक शालेय बसने लोहगड येथे आलेले होते. त्यापैकी एक बस (एमएच ०६ एस ९३८१) लोहगड येथून खाली उतरत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस दरीत उलटली. यात आठ जण गंभीर जखमी झाले तर काही जणांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना पुढील उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच, लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस पथक, शिवदुर्ग टीम यांच्यासह लोहगड, घेरेवाडी व औंढोली येथील पोलिस मित्र, पर्यटक यांनी अपघातग्रस्तांसाठी मदतकार्य केले. यावेळी लोणावळा, लोहगड, घेरेवाडी येथील स्थानिक तरुण, सरपंच नागेश मरगळे, पोलिस पाटील सचिन भोरडे, उपसरपंच गणपत महाराज ढाकोळ, लक्ष्मण साबळे, दत्तू विखार, भरत भोरडे, पंढरी विखार, मयूर ढाकोळ, चेतन विखार, बाळू गवारी आदी ग्रामस्थांनी शिव दुर्ग टीमला सहकार्य केले.

फोटो ः दुधिवरे खिंडीत शालेय बस कोसळली.
01483, 01484