शाळांसाठी भौतिक सुखसुविधांना प्राधान्य रज्जू श्रॉफ यांचे मत, पवना विद्या मंदिर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळांसाठी भौतिक सुखसुविधांना प्राधान्य 
रज्जू श्रॉफ यांचे मत, पवना विद्या मंदिर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
शाळांसाठी भौतिक सुखसुविधांना प्राधान्य रज्जू श्रॉफ यांचे मत, पवना विद्या मंदिर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

शाळांसाठी भौतिक सुखसुविधांना प्राधान्य रज्जू श्रॉफ यांचे मत, पवना विद्या मंदिर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

sakal_logo
By

पवनानगर, ता. २६ ः ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे अनेक कला गुण असून, त्यांना पुढे आणायचे असेल तर त्यांना भौतिक सुख सुविधा देणे गरजेचे आहे. यासाठी पवनमावळ भागातील शाळांमध्ये स्वच्छता, पर्यावरणीय क्रीडांगणे व क्रीडा साहित्यासारख्या भौतिक सुखसुविधा पूर्ततेसाठी प्राधान्य देणार असल्याचे मत शास्त्रज्ञ रज्जू श्रॉफ यांनी व्यक्त केले
पवना शिक्षण संकुल पवना विद्या मंदिर शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रॉफ बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे होते. यावेळी उद्योजक प्रदिप सागर, शिल्पा सागर, पवना असोसिएशनचे जनरल मॅनेजर रोहित श्रीवास्तव, सेक्रेटरी सुमीत चोक्सी, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील, संस्थेचे सचिव संतोष खांडगे, संस्थेचे संचालक सोनबा गोपाळे, महेशभाई शहा, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, कालेचे सरपंच खंडुजी कालेकर, उपसरपंच आशा कालेकर, माजी उपसरपंच फुलाबाई कालेकर,किसन घरदाळे, अरुण नायर, मधुकर काळे, माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर ठाकर, भास्कर खैरे, पवना फूल उत्पादक संघाचे संस्थापक मुकुंद ठाकर, तानाजी शेंडगे, संतोष ठुले, बबनराव कालेकर, सचिन मोहिते, प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष गोरख जांभूळकर, शिक्षक प्रतिनिधी गणेश ठोंबरे आदी उपस्थित होते.
यावेळी शरद बुट्टे पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास करायचा असेल तर शिक्षक, पालक व विद्यार्थी या त्रिकोणाचा वापर करूनच मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवता येते.
बाळा भेगडे म्हणाले की, समाज परिवर्तनाचे काम व विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षक करत असतो. शिक्षकांबरोबर पालकांचीदेखील विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची जबाबदारी आहे. ग्रामीण भागात शाळांमध्ये ज्या भौतिक सुविधा नाहीत, त्यासाठी विविध कंपन्यांच्या सीएसआर फंड उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जातील.
यावेळी पवना असोसिएशनच्यावतीने पवना विद्यालयास सुसज्ज स्वच्छतागृह बांधून देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली तर पवना असोसिएशनच्यावतीने शाळेतील ३५ आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरून त्यांना मदतीचा हात दिला.
संस्थेचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे शालेय समितीचे अध्यक्ष संतोष खांडगे यांनी प्रास्ताविक केले. सुवर्णा काळडोके, रोशनी मराडे यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षिका नीला केसकर यांनी आभार मानले

फोटोः 01493, 01494, 01495