
पवनाधरणात बुडून पर्यटकांचा मृत्यू.
पवनानगर ता. ८ ः मावळ तालुक्यातील पवनाधरण परिसरातील दुधिवरे गावाच्या हद्दीमध्ये पर्यटनासाठी आलेल्या मुंबई (कुर्ला) येथील एका शिक्षक पर्यटकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला आहे. प्रेमप्रकाश रोशनलाल भाटिया (वय ६२, रा. कुर्लाइस्ट नेहरूनगर, मुंबई ) असे मृतांचे नाव आहे. तसेच सद्या ते चेंबूर याठिकाणी राहत होते. ही घटना रविवार (ता.८) दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. पर्यटक दुधिवरे गावाच्या हद्दीत पवनाधरणावर फिरण्यासाठी आला होता. पवनाधरणाच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात पोहत असताना धरणाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. दुपारी १ च्या सुमारास लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व मावळ रेस्क्यू टिमच्या सह्याने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मृतदेह श्छेवदानासाठी तळेगाव येथे नेण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलिस तपास करत आहेत.