पवनानगरमध्ये दहावीच्या 
परीक्षेसाठीची तयारी पूर्ण

पवनानगरमध्ये दहावीच्या परीक्षेसाठीची तयारी पूर्ण

पवनानगर, ता. १ ः राज्यभरात दहावीच्या परीक्षेला उद्यापासून (ता.२) सुरूवात होणार आहे. त्यासाठी पवनानगर केंद्रात दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती केंद्र संचालक भाऊसाहेब आगळमे यांनी दिली. पवनानगर केंद्रामध्ये पवना विद्या मंदिर, वारु-कोथुर्णे विद्यालय कोथुर्णे, भैरवनाथ विद्यालय बौर, संत तुकाराम विद्यालय शिवणे, संत ज्ञानेश्वर विद्यालय दिवड, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय शिवली, माध्यमिक विद्यालय करुंज, ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय आजिवली या शाळांमधील एकूण ४४० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
परीक्षा ‘कॉपी मुक्त अभियाना’ साठी व परिक्षा शांततेत पार पाडण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून दक्षता समितीचे सदस्यही मदत करत आहेत. तसेच नूतन महाराष्ट्र प्रसारक मंडळाचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे शालेय समितीचे अध्यक्ष संतोष खांडगे यांनी केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी परीक्षा केंद्र प्रमुख भाऊसाहेब आगळमे, उपकेंद्र संचालिका नीला केसकर व परीक्षा विभाग प्रमुख भारत काळे, गणेश ठोंबरे यांनी विशेष प्रयत्न करत आहेत.
यावेळी आगळमे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात कॉफी मुक्त अभियान राबविण्यात आले आहे. पवनानगर केंद्रावर देखील या अभियानासाठी दक्षता समिती, पोलिस यंत्रणा व शाळेतील शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांची अंगझडती घेऊन वर्गात पाठविले जाईल व केंद्र कॉफी मुक्त राहण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com