पवना धरणात बुडून
युवकाचा मृत्यू

पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू

पवनानगर, ता. २४ ः पवना धरणात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. २३) घडली.
साहिल विजय सावंत (वय १८, रा. मुंबई) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका कॉलनीमध्ये राहणारे ९ युवक व ९ युवतींचा गट लोणावळा परिसरात रविवारी फिरण्यासाठी आला होता. त्यानंतर ते पवना धरण परिसरात आले. यावेळी ते फांगने गावच्या हद्दीतील पवना धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. त्यापैकी साहिलला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यातील हवालदार संतोष शेळके, नितीन कदम, पोलिस मित्र श्रीकांत घरदाळे, होमगार्ड भीमराव वाळुंज हे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी शिवदुर्ग मित्र लोणावळा व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला पाचारण करण्यात आले होते.
साहिलचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यंत्रणांना अखेर दुसऱ्या दिवशी सोमवारी यश आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com