कोथुर्णेत आज मराठी आरक्षण मंथन परिषद

कोथुर्णेत आज मराठी आरक्षण मंथन परिषद

पवनानगर ता. ५ ः मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पवनानगर येथे शनिवारी (ता. ६) राज्यस्तरीय मराठा आरक्षण मंथन परिषद होणार आहे. याबाबतची माहिती संयोजन समितीचे राज्य समन्वयक संतोष दळवी यांनी दिली. कोथुर्णे येथील भैरवनाथ सभागृहात सकाळी १०.३० ते ५.०० वाजताच्या दरम्यान परिषद होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळून लावली असल्यामुळे मराठा समाजात संभ्रम व निराशा निर्माण झाली आहे. त्यामुळे या बैठकीत आरक्षण संबंधी विषयांवर चर्चा व तज्ज्ञ यांचे सादरीकरण होणार आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याच्या प्रतिनिधी या मंथन परिषदेसाठी उपस्थित राहणार असल्याचे समन्वयक संतोष दळवी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com