पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये
पवना धरणग्रस्तांची आज बैठक

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पवना धरणग्रस्तांची आज बैठक

पवनानागर, ता. १८ ः पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत उद्या (शुक्रवारी) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
धरणग्रस्तांचे पुनर्वसन लवकर करावे, यासाठी पवना धरणावर नुकतेच आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या मध्यस्थीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून, आंदोलन स्थगित करण्यात आले होते. त्यानुसार उद्या बैठक लावण्यात आली आहे. संबंधित अधिकारी, धरणग्रस्त संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे अध्यक्ष नारायण बोडके यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com