तळेगाव दाभाडे गावाची
अंतिम मतदारयादी जाहीर

तळेगाव दाभाडे गावाची अंतिम मतदारयादी जाहीर

Published on

तळेगाव दाभाडे, ता. २ ः तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आगामी निवडणूकीसाठी अंतिम मतदारयादी जाहीर झाली आहे. एकूण ६४ हजार ६७८ मतदारांची नोंद झाली आहे. यात ३३,३०१ पुरुष, महिला ३१,३७५ आणि २ इतर मतदारांचा समावेश आहे.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी ही माहिती दिली. शासनाच्या आदेशानुसार मतदारयाद्या तयार करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. प्राथमिक, पूरक आणि दुरुस्ती असे टप्पे झाल्यानंतर अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत समाविष्ट नसलेल्या नागरिकांना अर्ज करण्याची मुदत संपली आहे. येत्या काही दिवसांत निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे १४, तळेगाव दाभाडे शहर सुधारणा समिती आणि जनसेवा विकास समिती यांचे प्रत्येकी सहा नगरसेवक विजयी झाले होते.
तपशील
प्रभाग ः मतदारसंख्या
१ ः ५०२०
२ ः ५३१८
३ ः ५६३५
४ ः ४८२५
५ ः ३३९२
६ ः ४४८८
७ ः ४३३१
८ ः ४७७२
९ ः ५८९०
१० ः ३५३०
११ ः ५१६२
१२ ः ३७५४
१३ ः ४८५७
१४ ः ३७०२
एकूण ः ६४,६७८
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com