कोंडीवडेत आपत्ती प्रशिक्षण शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंडीवडेत आपत्ती प्रशिक्षण शिबिर
कोंडीवडेत आपत्ती प्रशिक्षण शिबिर

कोंडीवडेत आपत्ती प्रशिक्षण शिबिर

sakal_logo
By

टाकवे बुद्रुक, ता. ९ : पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी आयोजित ज्ञानदा फाउंडेशन यांच्या संस्थेमार्फत मावळ तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन पथकास दोन दिवसांचे शोध, बचाव आणि प्रथमोपचार प्रशिक्षण देण्यात आले.

कोंडिवडे येथील आंद्रा नदीच्या पात्रात या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. बोट फुगवणे, पाण्याच्या पात्रात येणाऱ्या अडचणी, पाण्याच्या पात्रात एखादी घटना घडली, तर शोध व बचाव कार्य कसे करायचे, याविषयी माहिती देण्यात आली.
शिबिरात प्रशिक्षण अधिकारी कादर महाजन, लखन गायकवाड, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकावडे, विशाल चव्हाण, सर्कल अधिकारी सुरेश जगताप, तलाठी किरण जगताप, गणेश पोतदार, महसूल सहायक उत्तम लोंढे, कोतवाल बाबाजी असवले, बाळासाहेब काजळे, पोलिस पाटील नीलेश कडू, वन्यजीवरक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे, सदस्य नीलेश गराडे, जिगर सोलंकी, विनय सावंत, विकी दौंडकर, सत्यम सावंत आदींसह मावळ तालुका आपत्ती व्यवस्थापन पथक, तळेगाव व लोणावळा अग्निशामक दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
---------------------
फोटो
कोंडिवडे : आंद्रा नदीपात्रात जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापनाकडून मावळ आपत्ती व्यवस्थापन पथकास प्रशिक्षण देताना.

Web Title: Todays Latest Marathi News Tkw22b00491 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top