टाकवे बुद्रुकमध्ये असवले विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाकवे बुद्रुकमध्ये
असवले विजयी
टाकवे बुद्रुकमध्ये असवले विजयी

टाकवे बुद्रुकमध्ये असवले विजयी

sakal_logo
By

टाकवे बुद्रुक, ता. ८ : ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक येथील वार्ड क्रमांक १ मधील सदस्याने काही कारणास्तव सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. परिणामी एका जागेसाठी ६ उमेदवार रिंगणात उतरले होते. अर्ज माघारीच्या वेळी अखेर ४ उमेदवारांनी माघारी घेतल्यानंतर उरलेल्या दोन उमेदवारांची सरळ लढत झाली. त्यात विश्वनाथ सुभाष असवले विजयी झाले. त्यांना ४२८ तर प्रतिस्पर्धी उमेदवारांना २६५ मतदान झाले. तसेच ८ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली. एकूण ८५१ पैकी ७०१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ८२ टक्के मतदान झाले. निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी सुरेश जगताप व सहायक अधिकारी तलाठी गणेश पोतदार यांनी काम पाहिले.

फोटो : ०१५२९

Web Title: Todays Latest Marathi News Tkw22b00502 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top